05 December 2019

News Flash

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाकडून २१ मुलींचा लैंगिक छळ

सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाविरोधात २१ विद्यार्थिनींनी जबाब दिला आहे.

संग्रहित छायाचित्र

औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब घेत मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाविरोधात २१ विद्यार्थिनींनी जबाब दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून शाळेतील मुख्याध्यापक अश्लील भाषेचा वापर करुन बोलत होता, असा आरोप या मुलींनी केला आहे. या सर्व मुली सहावी ते आठवी या तीन वर्गातील आहेत.

मुलींनी हा प्रकार घरी सांगितला असता बुधवारी सकाळी पालकांनी शाळा गाठली. यानंतर पालकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे हे देखील शाळेत पोहोचले. त्यांनी २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला. या प्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रार दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाला आहे.

First Published on February 7, 2019 11:06 am

Web Title: soygaon headmaster of zp school sexually harassed 21 girls of 6th to 8th standard
Just Now!
X