03 March 2021

News Flash

‘मराठवाडय़ाचा युवावक्ता’ची उद्या अंतिम फेरी

‘मराठवाडय़ाचा युवावक्ता’ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवारी (दि. १४) होणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मराठवाडय़ाचा युवावक्ता’ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवारी (दि. १४) होणार आहे. देवगिरी महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दुपारी ४ वाजता खासदार सुप्रिया मुळे यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या वक्तृत्वाला वाव मिळावा या साठी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने मागील पाच वर्षांपासून ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात ५ जानेवारीला स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेऱ्या घेण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्य़ातील पहिले तीन विजेते स्पर्धक या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले. रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धा सुरू होईल. आमदार हेमंत टकले उद्घाटक आहेत.
महाअंतिम फेरीसाठी ‘राजकारणापलीकडे शरद पवार’, ‘सहिष्णुतेच्या देशात असहिष्णुतेचे राजकारण’, ‘सावकार अन् सरकारच्या विळख्यात अडकलेला शेतकरी माझा’, ‘शंभरात नव्वद परेशान, फिर भी मेरा भारत महान’ हे विषय ठेवण्यात आले आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २१, १५ व ११ हजारांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 1:56 am

Web Title: speech competition
टॅग : Competition
Next Stories
1 शारंगदेव महोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ
2 सिडको-हडकोत विस्कळीत पाणीपुरवठा
3 सूर्यकुंभातील नूडल्सची जागतिक विक्रमाला गवसणी
Just Now!
X