News Flash

राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीने राजकीय वातावरण तापले

नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा नगरसेवकांनी स्वतंत्र पत्रकार बठक घेऊन गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर एकाधिकारशाही आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप करत केलेले बंड हे वैयक्तिक

नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा नगरसेवकांनी स्वतंत्र पत्रकार बठक घेऊन गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर एकाधिकारशाही आणि भ्रष्ट कारभाराचे आरोप करत केलेले बंड हे वैयक्तिक स्वार्थातून असल्याचा पलटवार पक्षाचे शहराध्यक्ष विलास विधाते यांनी केला आहे. बंडखोर नगरसेवक शेख निजाम यांच्या खासगी पेट्रोल पंपाचे नाहरकत प्रमाणपत्र प्रकरण, फारुक पटेल यांचे जि.प.कन्या शाळेपाठीमागील भूखंड प्रकरण आणि खदीर जवारीवाले यांचे झमझम कॉलनीतील भूखंड प्रकरणात स्वार्थ साधला नसल्याने हे बंड झाले असल्याचा दावा करुन बंडखोर नगरसेवकांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही विधाते यांनी केली आहे.
बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दहा नगरसेवकांनी फारुक पटेल व मोईन मास्टर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र पत्रकार बठक घेऊन पालिकेचे सर्वेसर्वा पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर एकाधिकारशाही आणि शहरातील अनधिकृत बांधकामे, गरप्रकार, राखीव जागा विकणे अशा प्रकारचे गंभीर आरोप करुन बंड पुकारले. आगामी निवडणुकीत क्षीरसागरांविरुध्द निवडणूक लढवून पालिकेतील तीस वर्षांची क्षीरसागरांची सत्ता उखडून टाकण्याची घोषणाही केली. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत राजकारण पेटले आहे. डॉ.क्षीरसागर यांच्यावर आरोप करणाऱ्या नगरसेवकांच्या कारभारावरही पालिकेतील पक्षाच्या सभापतींसह नगरसेवकांनी प्रतिवार केला. पक्षाचे शहराध्यक्ष विलास विधाते यांनी नगरसेवकांचे बंड हे स्वार्थ साध्य होत नसल्याच्या अगतिकतेतून झाले आहे. बंडखोर नगरसेवक शेख निजाम यांचे शहरातील पेट्रोल पंपाला बेकायदेशीर नाहरकत प्रमाणपत्र प्रकरणाची बरीच चर्चा झाली आहे. खदीर जवारीवाले यांचे बार्शी नाका परिसरातील झमझम कॉलनीतील भूखंड आणि फारुक पटेल यांची जिल्हा परिषद कन्या शाळेपाठेमागील भूखंड प्रकरणही चर्चेत आहे. डॉ. क्षीरसागर यांच्याबरोबर पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम करताना या बंडखोर नगरसेवकांना एकाधिकारशाहीची जाणीव आणि भ्रष्ट कारभार दिसला नाही का, असा सवाल केला जात आहे.
दरम्यान, वर्षभरापासून शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील भ्रष्ट कारभाराविरुध्द संघर्ष केला जात आहे. शासनाने जिल्हा प्रशासनामार्फत पालिकेतील कारभाराची विशेष चौकशी करुन भ्रष्ट कारभारावर शिक्कामोर्तब केलेले असतानाही राजकीय दबावामुळे कार्यवाही होत नाही. या पाश्र्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी बंड  केल्याने पालिका बरखास्त करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष अॅड. राहुल मस्के यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2016 1:30 am

Web Title: speed to political environment due to ncp rebellious
टॅग : Beed,Ncp
Next Stories
1 निलंगेकरांच्या संपत्तीवर टाच
2 ‘पर्ल्स’मध्ये हजारो कोटी अडकले
3 जलयुक्त शिवार चांगले, पण..
Just Now!
X