25 February 2021

News Flash

औरंगाबाद : एसटीची रिक्षा आणि चारचाकी गाडीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

सिडको बस स्थानक परिसरात झाला अपघात

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात

औरंगाबादच्या सिडको बसस्थानक परिसरात एका एसटी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या आणि दोन ऑटो रिक्षा आणि एका स्विफ्ट डिझायर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. बालाजी गणपत ढवारे असं मृत व्यक्तीचं नाव असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटू शकलेली नाहीये.

संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरात मोठी रहदारी होती. यावेळी औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या एसटीचालकाचा आपल्या बसवरील ताबा सुटला. यानंतर सिग्नलनजीक थांबलेल्या दोन ऑटो रिक्षा आणि स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघातानंतर एसटीचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिस सध्या त्याचा शोध घेत असल्याचं कळतंय. दरम्यान अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2017 8:11 pm

Web Title: state transportation bus rammed into 2 auto rikshaw and swift desire at aurangabad killing 2 people on the spot
टॅग : Aurangabad
Next Stories
1 औरंगाबाद: कचरा डेपो विरोधातील आंदोलन स्थगित
2 …म्हणून औरंगाबादमध्ये नगरसेवकाने रस्त्यावरच जाळला कचरा !
3 हर्षवर्धन जाधव पुन्हा सेनेच्या व्यासपीठावर
Just Now!
X