News Flash

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

विद्यार्थिनी ९५ टक्के भाजली असून जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने तरुणाकडून होत असलेल्या सततच्या छेडछाडीला कंटाळून रॉकेल ओतून घेत जाळून घेतले. यामध्ये विद्यार्थिनी ९५ टक्के भाजली असून जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

बीड जिल्ह्यातील देवखेडा (ता.माजलगाव) येथील सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात रॉकेल ओतून घेत जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. वर्षभरापासून गावातीलच एका तरुणाकडून छेडछाड होत असल्याने विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले. शाळेत जाताना-येताना वारंवार त्रास देणे, मोबाइल दाखवत अश्लील हावभाव करणे या त्रासाला कंटाळूनच विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा जवाब पोलिसांनी नोंदवला आहे. या विद्यार्थिनीच्या आई-वडिलांचा एक वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने ती आपल्या आजीकडे राहत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 12:58 am

Web Title: student attempted suicide in beed
Next Stories
1 चोरी प्रकरणात दोघांना अटक; गावठी पिस्तुलासह साडेसात लाखांचा ऐवज जप्त
2 बीड जिल्ह्यतील १२ मदरशांना ५० लाखांचा निधी
3 ‘भारतीय समाजात आजही स्त्रीला पोटभाडेकरूची वागणूक’
Just Now!
X