21 September 2020

News Flash

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले आयुष्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल काकडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. वसतिगृह क्रमांक १ मध्ये या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. परभणी जिल्ह्यातील परतूर येथून तो शिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. विद्यापीठ वसतिगृहातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील रूम नंबर ७६ मध्ये अमोल वास्तव्यास होता. राहत्या रूममध्ये त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. तो कालच गावावरून आला असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेम प्रकरणातून अमोलने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 6:37 pm

Web Title: students suicide in the residences of dr babasaheb ambedkar marathwada university
Next Stories
1 ‘स्वच्छ भारत’ उपक्रम मराठवाडय़ात वेगात!
2 १०० कोटींचा निधी योग्यरित्या न वापरल्यास कोर्टात जाणार; एमएमआयचा इशारा
3 औरंगाबादमध्ये दोन बहिणींचे झोपेत असताना केस कापल्याचा नातेवाईकांचा दावा
Just Now!
X