23 November 2017

News Flash

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रेम प्रकरणातून आत्महत्या

औरंगाबाद | Updated: September 12, 2017 4:45 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश शंकरराव कोपरवाड (वय २३) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. विद्यापीठ वसतिगृहात आत्महत्या होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. सलग दोन आत्महत्या झाल्यामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्षात शिकत होता. वसतिगृह क्रमांक एकच्या खोली क्रमांक ९८ मध्ये गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली.

गणेश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. वसतिगृहात तो लहान भावासोबत राहत होता. सकाळी त्याने भाऊ आणि मित्रासोबत जेवण केले. त्यानंतर भाऊ आणि वसतिगृहातील इतर मुले ही विभागात लेक्चर साठी गेली मात्र गणेश गेला नाही तो रुमवरच थांबला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास जेंव्हा लहान भाऊ वसतिगृहाच्या खोलीत आला तेंव्हा त्याने दार उघडलं असता गणेशने चादरीच्या साहय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गणेशला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून या सुसाईड नोटवरून गणेशने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यापूर्वी अमोल काकडे या विद्यार्थ्याने वसतिगृह क्रमांक १ मध्येच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. परभणी जिल्ह्यातील परतूर येथून तो शिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. वसतिगृह क्रमांक १ मधील रूम नंबर ७६ मध्ये अमोलने आत्महत्या केली होती.

First Published on September 12, 2017 3:32 pm

Web Title: students suicide in the residences of dr babasaheb ambedkar marathwada university in aurangabad