News Flash

कोल्हापूरच्या कैद्याची औरंगाबादेत आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद रामचंद्र गोसावी (वय ६०) या कैद्याने येथील घाटी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या कैद्यास तोंडाचा

कोल्हापूर जिल्ह्यातील एका खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद रामचंद्र गोसावी (वय ६०) या कैद्याने येथील घाटी रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या कैद्यास तोंडाचा कर्करोग होता. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्याला औरंगाबादच्या कारागृहात हलविण्यात आले होते. नोव्हेंबरपासून दर तीन-चार दिवसांनी त्याला रुग्णालयात आणावे लागत असे. रात्री दोनच्या सुमारास वॉर्ड क्रमांक दहाच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या गजाला गमछा बांधून त्याने गळफास घेतला.
कोल्हापूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आनंद गोसावी याला नोव्हेंबरमध्ये औरंगाबाद येथील हर्सुल कारागृहात वैद्यकीय कारणासाठी हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. तोंडाचा कर्करोग असल्याने तो आजारपणाला वैतागला होता, असे सांगितले जाते. त्याचा आजारही बळावला होता. रात्री त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. बेगमपुरा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हय़ाची नोंद करण्यात आली. त्याची चौकशी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:40 am

Web Title: suicide of prisoner in aurangabad
टॅग : Aurangabad
Next Stories
1 ‘रेणू’च्या तीनपैकी २ बछडय़ांचा मृत्यू
2 अतिक्रमण ठरवून गरिबांची घरे पाडली
3 न्यायालयाच्या आदेशाने प्रभारी अभियंत्याची टेबल-खुर्ची जप्त
Just Now!
X