News Flash

भाजप-सेनेला जनताच जागा दाखवेल

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे टीकास्त्र

राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरत असून फसव्या घोषणा करणाऱ्या सेना-भाजप सरकारला जिल्हा परिषद निवडणुकीत जनता जागा दाखवेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनास प्रदेशाध्यक्ष तटकरे आले होते. राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सेना-भाजपपेक्षाही मोठे यश मिळणार आहे. भाजप-सेनेच्या नेत्यांनी फसव्या घोषणा देण्याशिवाय दुसरे काही कामच केलेले नाही. देशात नोटाबंदीनंतर सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. लोक भाजप सरकारवरील नाराजी या मतदानातून व्यक्त करतील, असेही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक विनोद गंगणे, माजी गटनेते नारायणराजे गवळी, नगरसेवक सचिन रोचकरी, युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष सचिन कदम, युवा नेते महेश चोपदार, संदीप गंगणे, भालचंद्र मगर, शरद जगदाळे उपस्थित होते. देवी दर्शनानंतर पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे स्वागत करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:56 am

Web Title: sunil tatkare comment on bjp 2
Next Stories
1 ‘निवृत्तीनंतर न्यायाधीशांना लाभाची पदे नकोत’
2 नामांतरातील शहिदांचे स्मारक उभारणार
3 दिंडी चालली.. पोरक्या मुलांची, शेतकरी जागृतीसाठी..
Just Now!
X