मौलाना आझाद एज्युकेशन संस्थेवरील नियुक्तीला विरोध

मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टमधून खासदार सुप्रिया सुळे यांना गो बॅकचा इशारा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी रविवारी दिला आहे. सुळे यांच्या नियुक्तीविरोधात तरुणांनी समाजमाध्यमावर चळवळही उभी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

महापालिकेच्या परिसरातील जवाहरलाल नेहरू भवनाते मौलाना आझाद ट्रस्टवर आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाल्याच्या पाश्र्वभूमीवर अल्पसंख्याक समाजातील तरुण, ज्येष्ठांचे मत ऐकून घेण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार जलील बोलत होते. यावेळी आमदार जलील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहिला तर त्यांच्या पक्षातील एकाही व्यक्तीचा एखाद्या संस्थेवर नियुक्तीच्या रूपात चंचूप्रवेश झाला, तर हळूहळू ती संस्था ते काबीज करतात. हीच राष्ट्रवादीची नीती आहे. देवगिरी शिक्षण संस्थेचे उदाहरण समोर आहे. तेथे मधुकर अण्णा मुळे यांना आमदार सतीश चव्हाणांना संस्थेवर घेऊन एका रात्रीत हटवले आहे. मौलाना आझाद एज्युकेशन संस्थेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीने देवगिरीचीच पुनरावृत्ती होण्याचा धोका असून आझाद संस्थेवर मुस्लिमेतर व्यक्तीला विरोध राहील.

प्रसंगी विद्यार्थ्यांना रस्त्यावरही उतरायला भाग पाडले जाईल, असा इशारा देत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी रविवारी संस्थेला राजकीय आखाडय़ापासून वाचवायचे असेल, तर सुप्रिया गो बॅक, असा नारा आमदार जलील यांनी दिला.

सुप्रिया सुळे यांना एज्युकेशन संस्थेवर घेणे, याचा अर्थ त्या संस्थेत राजकीय वातावरणाला वाव देणे आहे, असे सांगत आमदार जलील म्हणाले, सुळे यांची नियुक्ती करायची असेल, तर देवगिरी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासह राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या संस्थांमध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांची वर्णी लावावी. मला आझाद संस्थेऐवजी देवगिरीसारख्या संस्थेवर नियुक्त व्हायला आवडेल. शरद पवार यांनी ५० लाख रुपये संस्थेला दिल्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून सुळे यांची नियुक्ती केलेली असेल, तर संस्थेच्या अध्यक्षा फातिमा झकेरिया यांच्यापुढे तेवढीच रक्कम देणारे ५० लोक उभे करून ट्रस्ट वाचवू शकतो. सुप्रिया सुळे हटवा संस्था वाचवा, असेही आमदार जलील म्हणाले.

बैठकीत उपस्थितांची मतेही विचारात घेतली. एका तरुणाने सुळे यांच्या नियुक्तीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांच्या पदाचा संस्थेसाठी, समाजासाठी उपयोग करून घेता येईल, यातून पाहावे, असे सुचवले. सुळे या व्यक्ती म्हणून चांगल्या आहेत, असेही तो तरुण म्हणाला. अ‍ॅड. सय्यद यांनी सुळे यांच्या नियुक्तीला विरोधच करायचा होता, तर शरद पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी संस्थेला दिलेल्या ५० लाखांच्या देणगीलाही नाकारावे, अशी चळवळ तेव्हा उभी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन अकरा-अकरा महिने होत नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संस्था अल्पसंख्याकांची असून एकवेळ बौद्ध, जैन चालतील, पण मराठा असलेल्या सुप्रिया नकोत, असाही मुद्दा काहींनी मांडला. सुळे नामक चिंगारी कहीं शोला ना बन जाय, असे मसूद शेख म्हणाले.

एमआयएमच्या एका नगरसेवकाने आठवडय़ाच्या आत सुळे यांना हटवले नाही, तर गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. व्यासपीठावर पत्रकार शाकेर नसबंदी, नासेरभाई चाऊस, मकसूदभाई, सरताज पठाण, अन्वर कादरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.