28 November 2020

News Flash

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचे निधन

 सुरेश रामचंद्र केतकर यांचे शनिवारी सकाळी ८ वाजता विवेकानंद रुग्णालयात निधन झाले.

सुरेशराव केतकर

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश रामचंद्र केतकर (वय ८२) यांचे शनिवारी सकाळी ८ वाजता विवेकानंद रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पाíथवावर मारवाडी स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अशोकराव कुकडे, प्रांत कार्यवाह हरिशभाऊ कुलकर्णी, प्रांत प्रचारकप्रमुख तात्या देशपांडे आदी उपस्थित होते.

सुरेशराव केतकर हे मूळचे पुण्याचे स्वयंसेवक. त्यांचे शिक्षण बी.एसस्सी. बी.एड्.पर्यंत पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून १९५४ साली संघाचे प्रचारक निघाले. सुरुवातीला सोलापूर जिल्हा प्रचारक, त्यानंतर सोलापूर विभाग प्रचारक, महाराष्ट्र प्रांत शारीरिक शिक्षणप्रमुख, अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख, अखिल भारतीय सहसरकार्यवाह, अखिल भारतीय प्रचारकप्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. संस्कार भारती व क्रीडा भारती या संघटनेचे ते प्रारंभापासून संरक्षक होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था- अंबाजोगाई, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान-लातूर व जनता सहकारी बँक-पुणेचे ते मार्गदर्शक होते. शनिवार, २३ जुल रोजी  केतकर यांच्या श्रद्धांजली सभेचे दयानंद सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले असून या सभेसाठी सरसंघचालक मोहनराव भागवत उपस्थित राहणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:30 am

Web Title: suresh rao ketkar passes away
Next Stories
1 पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याचा गाळप परवाना रद्द
2 पीक विमा पैशाअभावी बँक रक्कम लुटण्याचा प्रयत्न
3 मुक्त विद्यापीठ ‘ऑफलाइन’!
Just Now!
X