20 March 2019

News Flash

फ्लिपकार्टवरून तलवार, जंबियाचा शस्त्रसाठा मागवला

आठ जणांना अटक केली असून शहरातील एकूण २४ जणांनी वेगवेगळ्या भागांतून ही शस्त्रास्त्रे मागवल्याची माहिती हाती आल्याचे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी

फ्लिपकार्टवरून तलवार, जंबियाचा शस्त्रसाठा मागवला

औरंगाबादेत पोलिसांची कारवाई, आठ जणांना अटक

ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून मोबाइल, पेनड्राइव्हसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील वस्तू नव्हे तर चक्क तलवारी, चाकू, जंबियासारखे प्राणघातक हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्रास्त्रेच खरेदी केल्याचा प्रकार औरंगाबादच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री उघडकीस आणला. याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून शहरातील एकूण २४ जणांनी वेगवेगळ्या भागांतून ही शस्त्रास्त्रे मागवल्याची माहिती हाती आल्याचे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली.

शहरातील नागेश्वरवाडी व जयभवानीनगर येथील फ्लिपकार्ट व को. मार्केटिंग इन्स्टाकार्ट सव्‍‌र्हिसेसच्या गोदामातील पार्सलमध्ये हा शस्त्रसाठा आढळून आला. त्यात जयभवानीनगरमधील कार्यालयात आढळलेल्या एकूण आठ पार्सलमध्ये आठ तलवारी, एक मोठा चाकू , एक कुकरी तर नागेश्वरवाडीतील कार्यालयातून १८ पार्सलमधून चार तलवारी, दोन गुप्ती, पंधरा चाकू जंबिया, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही शस्त्रे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संदर्भातील कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. त्यामध्ये जयभवानीनगर कार्यालयातील कागदपत्रांमध्ये इमरान शेख (एन-४), अरुण प्रजापती (चिश्तिया चौक), चंदू लाखोलकर (एन-२), मुकेश पाचवणे (रा. हर्सूल), सागर पाडसवान व ऋषिकेश पालोदकर (रा. गारखेडा) व नवीदखान (रा. उस्मानपुरा) यांनी तर नागेश्वरवाडी येथील कार्यालयातील माहितीत अब्दुल मजीद, फैजान, दिनेश सोनवणे, विकास दळवे, रोहित काटा, शेख मजेन, शेख माजेद, अमान खान, जावेद खान, रोहित, जितेश राठोड, विजय खरात, सय्यद शहबाज, अमर बालकिशन, साम आर. के., जुबेर शहा या ग्राहकांनी ही शस्त्रास्त्रे मागवल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. यातील नावीद खान उबेद खान, चंदन लाखोलकर, मुकेश पाचवणे, सागर पाडसवान, जुबेर दिलावर शहा व विकास दळवे यांना सकाळीच अटक केली तर एका बालकासह अन्य एकाला सायंकाळी अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. याप्रकरणी शस्त्रांची मार्केटिंग व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध क्रांती चौक व मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, योगेश धोंडे, अनिल वाघ, नंदकुमार भंडारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

First Published on May 30, 2018 3:48 am

Web Title: sword jambiya online shopping from flipkart aurangabad riots