जि. प.च्या लघुपाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता निवडुंगे यांची टेबल-खुर्ची न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली.
मुदखेड तालुक्यातील रोहििपपळगावअंतर्गत वासवाडी तांडा येथील शेतकरी हट्ट लच्छमा राठोड, सोमला राठोड यांची जमीन वासवाडी सिंचन प्रकल्पांतर्गत जि. प.च्या लघुपाटबंधारे विभागाने अधिगृहित केली होती. त्यांचा मावेजाही अत्यल्प प्रमाणात दिला होता. परंतु या शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी नांदेडच्या न्यायालयात मावेजा वाढवून मिळावा, या साठी धाव घेतली होती. सन २०१०मध्ये न्यायालयाने या प्रकरणी मावेजा वाढवून द्यावा, असे आदेश दिले होते.
न्यायालयाने वाढवून दिलेल्या मावेजासाठी या शेतकऱ्यांनी जि. प.च्या लघु पाटबंधारे विभागाकडे वारंवार चकरा मारल्या. परंतु लघुपाटबंधारे विभाग त्यांचा वाढवून दिलेला मावेजा देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायमूर्तीनी पसे भरा अन्यथा जप्ती करण्यात येईल, असे आदेश दिले होते. यावरून हट्ट लच्छमा राठोड यांना ५५ हजार ९ रुपये, तर सोमला राठोड यांना १ लाख ७८ हजार ८९१ रुपये अधिकचा मावेजा द्यावा, असे आदेश दिले होते. परंतु लघुपाटबंधारे विभाग हा मावेजा देण्यास असमर्थ ठरल्याने न्यायालयाने त्यांच्या कार्यालयातील वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयातील जप्ती अधिकारी एस. बी. कोतवाले, शेख सत्तार शे. फरीद यांनी बुधवारी जि. प. लघुपाटबंधारे विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता निवडुंगे यांची खुर्ची जप्त केली. त्यासोबतच कार्यालयातील टेबल, तीन संगणक, सीपीयू, िपट्रर यांच्यासह सहा खुच्र्या जप्त केल्याची कारवाई केली. हे साहित्य न्यायालयात जमा करणार असल्याचेही जप्ती अधिकारी कोतवाले यांनी स्पष्ट केले.