News Flash

खडसे यांचा हेलिकॉप्टर दौरा अन् १० हजार लिटर पाण्याची नासाडी!

लातूरच्या पाणीप्रश्नी औसा तालुक्यातील बेलकुंड येथे महसूलमंत्री एकनाथ खडसे शुक्रवारी हेलिकॉप्टरने आले. विशेष हेलिपॅड तयार करण्यासाठी दहा हजार लिटर पाणी खर्ची पडले!

दुष्काळी उपाययोजनांवर विधानसभेमध्ये एकनाथ खडसे म्हणाले, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकर पुरविण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांत वाढ करण्यात आली आहे.

लातूर येथील पाणीप्रश्नाचा आढावा घेण्यासाठी आलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे हेलिकॉप्टर औसा तालुक्यातील बेलकुंड येथे उतरावे, म्हणून बनविलेल्या हेलिपॅडसाठी १० हजार लिटर पाणी खर्ची पडले. ऐन टंचाईत पाण्याच्या या अपव्ययावर आता प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर त्यांच्याकडून पाणी वापराबाबत लंगडे समर्थन करण्यात आले.
लातूर शहरातील पाणी टंचाई देशभर गाजते आहे. दररोज लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा होतो. ही रेल्वे सुरू झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. अशा वातावरणात मंत्री खडसे यांनी लातूरचा दौरा केला. जळगाव, मुक्ताईनगरमधून ते लातूर विमानतळावर आले. तेथून विशेष हेलिकॉप्टरने औसा तालुक्यातील बेलकुंड येथे गेले. तेथील पाहणी संपल्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने परत लातूर विमानतळावर आले आणि मुक्ताईनगरकडे मोटारीने रवाना झाले.
वास्तविक, लातूर ते बेलकुंड हे अंतर केवळ ४० किलोमीटर आहे. एवढय़ा कमी अंतरासाठी हेलिकॉप्टरचा घाट घालण्यात आला. त्यासाठी १० हजार लिटर पाणी खर्ची घातले. या अनुषंगाने खडसे यांना विचारले असता, मला एवढं पाणी लागेल असेल हे माहीत नाही. हेलिकॉप्टर उतरले तेव्हा धूळ उडत होती. त्यामुळे एवढे पाणी लागले नसेल, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कृतीचे लंगडे समर्थन केले.
लातूर येथे पत्रकार बैठकीत त्यांनी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मातोळा दहा खेडी पाणीपुरवठा योजना बंद होती. त्याची डागडुजी करून ती सुरू करण्यात आली. त्या दुरुस्तीची  गोपनीयता ठेवण्याचे कोणतेच कारण नव्हते. मात्र, कार्यक्षमता अधिक ठळकपणे दिसावी म्हणून हा प्रकार जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 1:20 am

Web Title: the helicopter tour and khadse 10 thousand liters of waste water
टॅग : Eknath Khadse
Next Stories
1 जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांविरुद्ध खासदार सुनील गायकवाड आक्रमक
2 ‘आयसीटी’चे उपकेंद्र औरंगाबादमध्ये सुरु करण्याच्या हालचाली!
3 जि. प. पाणीपुरवठा विभागात साडेतीन कोटींचा घोटाळा
Just Now!
X