11 December 2017

News Flash

‘इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष’ शुभारंभ कार्यक्रमाला गर्दी; पण नियोजन बारगळलं !

भाषणे सुुरु झाल्यावर बॅनर लावण्याची लगबग

औरंगाबाद | Updated: August 13, 2017 3:30 PM

औरंगाबाद : भाषणे सुरु असताना बॅनर लावताना कार्यकर्ते.

“कोशिश करणे वालो की कभी हार नही होती”…. या ओळी व्यासपीठावरून बोलल्या जात होत्या. त्यावेळी पाठीमागे कार्यक्रमाचे मुख्य बॅनर लावण्याची ‘कोशिश’ सुरु होती. हे चित्र माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात होते. यामुळे कार्यक्रमाचे नियोजन बारगळल्याचे चित्र होते.

स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत काँग्रेसकडून इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उदघाटन सोहळा औरंगाबादमध्ये घेण्यात आला. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते.

शिरस्थ नेतृत्वाचा हा कार्यक्रम असताना देखील औरंगबाद काँग्रेसमध्ये नियोजनाचा अभाव दिसला. कार्यक्रमाची नियोजित वेळ झालेली असताना. काँग्रेस कार्यकर्ते झेंडे आणि बॅनर लावत होते. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी होती, मात्र योग्य नियोजन नव्हते.

कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर, उत्तर प्रदेश घटनेतील मृतांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी तयार करण्यात आलेली वीस मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली मात्र, ती इंग्रजी भाषेत होती. कार्यक्रमासाठी मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून काँग्रेस कार्यकर्ते आले होते. त्यामुळे फक्त चित्र पाहण्याचे काम अनेक कार्यकर्त्यांना करावे लागले. त्यामुळे पुढे काय सुरु आहे. हे ग्रामीण भागातील महिलांना समजत नव्हते. त्यामुळे आयोजकांनी फक्त सोपस्कार पार पडायचे आणि पाहुण्यांना दाखवायचे म्हणून ती बनवली असल्याची चर्चा येथे होती.

First Published on August 13, 2017 3:24 pm

Web Title: the indira gandhi birth centenary event organized but the planning is poor