News Flash

गोदावरी नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

अर्धा ते पाऊण तासानंतर मृतदेह मिळाले.

गोदावरी नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू (प्रातिनिधीक छायाचित्र)

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. रामा ढगे ( वय १०), अमृता गिराम (वय ११) आणि ऋषिकेश गिराम ( वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत. परभणीमधील पाथरी तालुक्यातील गोपेगाव परिसरात सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

गोपेगाव येथील बाळासाहेब गिराम आपल्या कुटुंबीयसह मुलांच्या शिक्षणासाठी पाथरी इथं वास्तव्यास आहेत. मात्र कुटुंबातील विवाह सोहळा असल्यामुळे ते आपल्या मुलांसह गावी आले होते. ७ तारखेला विवाह पार पडला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी ऋषीकेश आणि अमृत गिराम दोन्ही मुले गोपेगाव येथील नदीपात्रात  पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत या गावात वास्तव्यास असणारा रामाही होता. ही मुले धुणे धुण्यासाठी नदीवर आलेल्या महिलांसोबत या ठिकाणी आली होती. त्यांची नजर चुकवून ती पाण्यात उतरली.  नदीचे पात्र खोल असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ही तिन्ही मुले बुडू लागली. बुडणाऱ्या मुलांना वाचवा म्हणून महिलांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. महिलांचा ओरडण्याच्या आवाजाने नदीवर असणाऱ्या ग्रामस्थांनी पाण्यात उड्या घेतल्या परंतू तो पर्यंत ही मुले बुडाली होती. अर्धा ते पाऊण तास पाण्यात शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. तिन्ही मृतदेह पाथरी रुग्नालयात आणले असता डाक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर गावशिवारात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 10:31 pm

Web Title: three children die drowning in godavari river
Next Stories
1 स्वच्छता मोहिमेतील ढिसाळ कामामुळे गंगापुरमधील ८ ग्रामसेवक निलंबित
2 पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नीचा छळ
3 तपोवन एक्सप्रेसमधून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरुप सुटका
Just Now!
X