News Flash

सिद्धार्थ उद्यानातील रेणू बिबटय़ाची दोन्ही पिल्ले दगावली

शहरातील सिद्धार्थ उद्यानातील रेणू या बिबटय़ाची दोन्ही पिल्ले पहाटे चार वाजता दगावली.

शहरातील सिद्धार्थ उद्यानातील रेणू या बिबटय़ाची दोन्ही पिल्ले पहाटे चार वाजता दगावली. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत दोन्ही पिल्लांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात होते. मृत्त पिल्लांना पाहून अधिकारीही चक्रावले. चौथ्यांदा पिल्लांना जन्म देणाऱ्या रेणूचे बछडे वाचत का नाही, याचा शोध घेण्यासाठी गुणसुत्रांची तपासणी केली जाणार आहे. रेणू मादीला सिद्धार्थ उद्यानात डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथून आणण्यात आले होते. महापालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या सिद्धार्थ उद्यानातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रेणूने तीन पिल्लांना जन्म दिला होता. तेव्हा तिला नागपूरहून आणताना योग्य ती काळजी न घेतल्याने पिल्लांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणात प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. दोन दिवसांपूर्वी रेणूने पुन्हा दोन पिल्लांना जन्म दिला.

या दोन पिल्लांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत होते. रेणूची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने रात्री पाहणी केली असता ती पिल्लांबरोबर खेळत होती. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारीही निर्धास्त होते. पहाटे या दोन्ही पिल्लांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना देण्यात आली. दोन्ही पिल्लांचे शवविच्छेदन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त जे. एम. पांडे, पशुविकास अधिकारी डॉ. बी. व्ही. देशमुख, डॉ. चंदेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत रेणूच्या पाच पिल्लांचा सिद्धार्थ उद्यानात मृत्यू झाला आहे. यापूर्वीदेखील हेमलकसा येथे असताना पिल्लांचा मृत्यू झाला होता. राजा आणि रेणू या जोडीचे पिल्ले जिवंत का राहत नाही, याची तपासणी केली जाणार आहे. रेणूचे वय ६ वर्षे, तर राजाचे वय ७ वर्षे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:14 am

Web Title: tiger child dead
Next Stories
1 ‘सनातन’ वर बंदी घालण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
2 ‘कोपर्डी’च्या तपासाबाबत ग्रामस्थांचा पोलीसांवर आरोप
3 रोहयो कामावर मृत अन् अपंग व्यक्ती
Just Now!
X