News Flash

औरंगाबादेत गुलाबजामच्या पाकात पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दलालवाडी परिसरात राहणाऱ्या मेघावाले यांच्या घरात गुरुवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी बनवलेल्या गुलाबजामच्या पाकात पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. राजवीर नितीन मेघावाले असे चिमुकल्याचे नाव असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दलालवाडी परिसरात राहणाऱ्या मेघावाले यांच्या घरात गुरुवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी घराजवळ स्वयंपाक करत होते. यादरम्यान, दोन वर्षांचा राजवीर खेळता खेळता तिथे पोहोचला. घरातील सर्व जण कार्यक्रमात व्यस्त होते आणि याच दरम्यान राजवीर गुलाबजामसाठी तयार केलेल्या गरम पाकाच्या कढईत पडला. यात तो गंभीररित्या भाजला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून त्याची प्रकृती गंभीर होती. अखेर मृत्यूशी सुरु असलेली त्या चिमुरड्याची झुंज अपयशी ठरली. सोमवारी पहाटे राजवीरचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2018 2:08 pm

Web Title: tragic incident 2 year old boy dies gulab jamun big utensil
Next Stories
1 शिवसेना सोबत राहावी, ही इच्छा – रावसाहेब दानवे
2 तरुणांच्या हाती ‘फूड डिलिव्हरी’चे काम
3 औरंगाबादमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याची आत्महत्या
Just Now!
X