18 October 2019

News Flash

तुळजाभवानी संस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास येत्या १३ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास येत्या १३ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस व कोजागरी पौर्णिमेचे ३ दिवस भरणारी ही यात्रा देशातील सर्वात मोठी ‘नवरात्र’ आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नवरात्रासाठी विविध खात्यांमार्फत यात्रेची तयारी केली असून भाविकांची सर्व प्रकारची गरसोय होऊ नये, या साठी पालिकेनेही सर्व खात्यांना २४ तास सज्ज राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिर संस्थानकडून धार्मिक कार्यक्रमांची कार्यक्रमपत्रिका जारी केली असून त्यानुसार १३ ऑक्टोबरला देवीच्या घटाची मिरवणूक काढून विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत देवीची नित्योपचार पूजा व अभिषेक महापूजा होते. १७ ऑक्टोबरला नवरात्राचे आकर्षण असणारी पहिली अवतार पूजा मांडली जाईल. त्यानुसार ललिता पंचमीदिवशी रथालंकार महापूजा, १८ ला मुरली अलंकार महापूजा, १९ ला देवीसमोर शेषशाही अलंकार महापूजा होईल. दि. २० ला ऐतिहासिक भवानी तलवार महापूजा, तर दुर्गाष्टमीनिमित्त दि. २१ ला भवानीमातेसमोर महिषासूरमर्दनिी महाअलंकार महापूजा होणार आहे. याच दिवशी सकाळी ८ वाजता वैदिक होमहवनाचा कार्यक्रम होईल. दुपारी एक वाजता पूर्णाहूती दिली जाणार आहे.
दि. २३ ला सकाळी नित्योपचार पूजा झाल्यानंतर होमावरील धार्मिक विधी साजरा होईल. घटस्थापनेनंतर होमावरील अजाबळी कार्यक्रमाने नवरात्रीची सांगता होणार आहे. महानवमीच्या सायंकाळी ६ वाजता तुळजाभवानी देवीचे विधिवत सीमोल्लंघन साजरे केले जाणार आहे. त्यानंतर तुळजापुरातील नागरिक सीमोल्लंघन साजरे करतात. दि. २२ ला पहाटे ४ ते ५ या वेळेत देवीच्या मंदिरातील िपपळाच्या पारावर नगरपालखीत बसून देवीचे सीमोल्लंघन होणार आहे. त्यानंतर देवीची श्रमनिद्रा सुरू होते.
सीमोल्लंघनानंतर देवीची मूर्ती नगरच्या तेल्यांच्या पलंगावर आपली श्रमनिद्रा घेते. ती २६ ऑक्टोबपर्यंत चालू राहते. कोजागरी पौर्णिमेदिवशी ही निद्रा पूर्ण होऊन मूर्ती पुन्हा चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येईल व दहीदुधाचे अभिषेक, पूजा होईल. दि. २७ ला सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठय़ांचे आगमन होते. त्यांच्यासोबत देवीचा छबीना रात्री १० वाजता निघतो. दि. २८ ला अन्नदान महाप्रसाद दिला जातो. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे, आमदार मधुकर चव्हाण, नगराध्यक्षा जयश्री कंदले, मंदिर तहसीलदार सुजीत नरहिरे, काशीनाथ पाटील हे संस्थानचे पदाधिकारी नवरात्र महोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

First Published on October 6, 2015 1:40 am

Web Title: tuljabhavani ready for navratri festival
टॅग Navratri Festival