शेती विकल्याचे पसे मागितले, याचा राग धरून दोन सख्ख्या बहिणींनी जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केला. तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे शुक्रवारी हा थरार घडला. या प्रकरणी दोघी बहिणींसह जावयाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तिघांनाही पोलिसांनी अटक केली.
सिंदगाव येथील भुजंग कुंडला शिंदे (वय ६५) शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वत:च्या घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने पोलिसांना त्यांचा मृत्यू संशयास्पद वाटला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात कारणाचा उलगडा झाला. मृताच्या मुली मीनाबाई सिद्धेश्वर गायकवाड, तिचा पती सिद्धेश्वर दिगंबर गायकवाड (कुन्सावळी), तसेच दुसरी मुलगी सीना हिरालाल मिखने या तिघांनी संगनमत करून भुजंग िशदे यांना तीक्ष्ण हत्याराने छातीवर, पोटावर, गळ्यावर व खांद्याजवळ वार करून ठार मारले. या बाबत मसू कुंडला िशदे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक केली.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा