सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात शेतकरी आत्महत्या समितीच्या बठकीत २५ एप्रिल ते २६ जूनपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ११पकी ९ कुटुंबांना मदत जाहीर झाली. मात्र, जिल्ह्य़ात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. वसमत तालुक्यातील पार्डी खु. व सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोन शेतकऱ्यांनी नापिकाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.
जिल्ह्यात आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जानेवारी ते २६ जूनपर्यंत ही संख्या २२ होती. पकी आत्महत्येची ११ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, तर आठ प्रकरणे चौकशीवर असताना त्यात नव्याने तीन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भर पडली. शेतकरी आत्महत्या जिल्हा समितीच्या ४ सप्टेंबरला झालेल्या बठकीत ९ प्रकरणे पात्र ठरली. एका शेतकऱ्याच्या प्रकरणावर चौकशी सुरू आहे, तर एका शेतकऱ्याला अपात्र ठरविण्यात आले.
दरम्यान, या समितीची बठक संपते न संपते तोच गुरुवारी वसमत तालुक्यातील पार्डी खु. येथील शंकर किशनराव नरवाडे (वय ५०) या शेतकऱ्याने विषारी औषध घेतले. या शेतकऱ्याकडे ५७ गुंठे जमीन आहे. सततची नापिकी व जिल्हा बँकेचे दहा हजारांवर पीककर्ज यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा, या विवंचनेत ते होते. वसमत पोलिसांत या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जनार्दन तुळशीराम खिल्लारी (वय ३२) या शेतकऱ्याने शुक्रवारी रात्री कर्जबाजारीपणास कंटाळून राहत्या घरी विष घेऊन जीवनयात्रा संपविली. जनार्दनने शुक्रवारी रात्री विष घेतले. घरच्या लोकांनी त्याला गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने रात्रीच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. जनार्दनला ५ एकर जमीन आहे. दोन वर्षांच्या नापिकीमुळे तो आíथक संकटात होता. हैदराबाद बँकेचे ५० हजारांचे पीककर्ज व सावकारी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत तो होता. गोरेगाव पोलिसांत या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद झाली.