18 October 2018

News Flash

पैठण-पाचोड रोडवर दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू

दोघांवर घाटी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत

पैठण-पाचोड रोडवर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला.

पैठण-पाचोड रोडवर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्ञानेश्वर नमाणे (वय २४ ) आणि शुभम रत्नाकर सोनवणे अशी मृतांची नावे आहेत.अपघातात जखमी झालेल्या आकाश विश्वनाथ मगरे, आकाश आबासाहेब थोरात यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व पाचोडा तालुका पैठण येथील रहिवासी आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास पैठण येथील लग्न सोहळा आटोपून शुभम रत्नाकर त्याच्या मोटरसायकलवरुन पाचोडाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी मयत ज्ञानेश्वर हा दुचाकीवरुन पैठणच्या दिशेने येत होता. सोलनापुर फाट्याजवळ एका ट्रॅकला ओव्हरटेक करत असताना दोघांची समोरासमोर धडक झाली. यात ज्ञानेश्वर नेमानेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुभम रत्नाकर सोनवणे याने अखेरचा श्वास घेतला.

First Published on December 4, 2017 7:37 pm

Web Title: two killed bike accident in aurangabad