04 March 2021

News Flash

दुचाकीच्या धडकेत महिला ठार

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

औरंगाबाद : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सेव्हनहिल पुलावर घडला असून महिलेस धडक देणारा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

गीतांजली असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राहुल शिंदे (रा. औरंगाबाद) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. गीतांजली जेहुरकर या काल्डा कॉर्नर परिसरातील एका विमा कंपनीत नोकरीला होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी त्या कार्यालयात जात असताना त्यांना सेव्हनहिल पुलावर समोरच्या विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली.

दुचाकीवरून खाली पडलेल्या गीतांजली जेहुरकर यांच्या डोक्याला पुलाचा कठडा लागल्याने त्यांचे डोके फुटले होते. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असतांना गीतांजली जेहुरकर यांचा मृत्यू झाला. तर राहुल शिंदे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:50 am

Web Title: two wheeler women accident death akp 94
Next Stories
1 हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप-मनसे सरसावली
2 नामकरणाच्या मुद्दय़ावरून भाजपकडून निषेधासाठी काळे शर्ट
3 औरंगाबादमध्ये १५० कोटींच्या रस्त्यांवरून राजकारण!
Just Now!
X