X

अपंगांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या दोन तरुणांना औरंगाबादेत अटक

विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेत होते.

औरंगाबादच्या एमजीएम कॉलेज कॅम्पसमध्ये अपंगांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. लखन राव आणि विकी कुमार अशी या दोघांची नावं आहेत. दोघेही मूळ राजस्थानचे रहिवासी आहेत.

अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी निधी गोळा करत असल्याचं सांगून विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेत होते. मात्र राजस्थानमध्ये तुमची संस्था कुठे आहे? त्याचे काही पुरावे आहेत का ? अशी विचारणा केल्यानंतर हा फसवेगिरीचा प्रकार असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ४ हजाराहून रोख रक्कम आढळून आली. हे संशयित  एका दिवसात २५-३० हजार रूपये उकळत असल्याचा अंदाज आहे. शहरात त्यांचे आणखी काही साथीदार देखील अशाच प्रकारचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. एमजीएम जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी एन ७ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Outbrain