27 September 2020

News Flash

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीने समोरून भरधाव आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने पिता-पुत्र गंभीर जखमी झाले.

उद्धव ठाकरे

पिता-पुत्र जखमी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीने समोरून भरधाव आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. अपघात होताच पोलिसांनी तत्काळ चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. बीडजवळील खजाना बावडी येथे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
जिल्ह्य़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे यांचे उस्मानाबादहून सायंकाळी पाचच्या सुमारास चौसाळा येथे आगमन झाले. काही शेतकऱ्यांशी चर्चा करून ठाकरे यांच्यासोबतच्या ५० गाडय़ांचा ताफा बीडकडे येत होता. खजाना बावडीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला ताफ्यातील एका गाडीने जोराची धडक दिली. यात दिलीप वाघ (वय ४०) व त्यांचा मुलगा शुभम (वय १२, खडकीघाट) गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी तत्काळ ताफा थांबवून ताफ्यातील चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:44 am

Web Title: uddhav thackeray security car knocks down bike
Next Stories
1 एक घास पक्ष्यांसाठी शाळेत स्वखर्चाने उपक्रम
2 उस्मानाबाद बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता कायम
3 बनावट कागदपत्रे देऊन सैन्यात भरती; ४३ तरुणांविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X