शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (दि. २९) जिल्हा दौऱ्यावर येत असून दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तीन शेळ्या देण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून या वेळी जवळपास एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अजून कुठलीही मदत मिळाली नाही. यापूर्वीच सेनेने बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत शेतकऱ्यांना आíथक मदत केली. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांचे रविवारी दुपारी १ वाजता जिल्ह्य़ात आगमन होणार असून नसíगक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उपस्थितीत १० हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या लिलावातून जमा झालेली रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा विमा शिवसेना काढणार असून त्यांना शेळ्या देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त, नसíगक आपत्तीत्रस्त व सद्यस्थितीत उपजीविकेचे कुठलेही साधन नसलेल्या शेतकऱ्यांना शिवसेना मदत करणार आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांची बठक पार पडली. बठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव व संजय कच्छवे यांनी भूषविले. बठकीत सर्व तालुकाप्रमुखांना मदतवाटप करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची यादी वितरीत करून या मदतवाटपातून कोणीही गरजवंत शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री दिवाकर रावते शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी होणाऱ्या मदत वाटपाच्या कार्यक्रमास आमदार सुभाष भोईर यांची उपस्थिती राहणार आहे. बाजार समिती आवारात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होईल. मदतवाटप कार्यक्रम सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. माजी आमदार मीरा रेंगे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे, सदाशिव देशमुख, माणिक पोंढे, कल्याण रेंगे, नंदकुमार अवचार, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.