27 November 2020

News Flash

‘उजनीचे पाणी धनेगाव धरणात’

गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकर अडचणीत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकर अडचणीत आहेत. उजनीचे पाणी लातूरकरांना लवकर देता यावे यासाठी उजनीहून बंद पाइपलाइनद्वारे धनेगाव धरणात सिना-कोळेगाव माग्रे पाणी आणण्याची २०० कोटी रुपयांची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून या योजनेमुळे लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्हय़ातील ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा केला जाणार आहे. आगामी तीन महिन्यांत या कामाला मंजुरी मिळेल व १२ ते १८ महिन्यांत ही योजना पूर्ण होईल.

या योजनेची संकल्पना विलासराव देशमुख यांचीच होती. ती आता पूर्णत्वास येत आहे याबद्दल लातूरकर समाधानी असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले.

लातूर शहराच्या नाना-नानी पार्कच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, महापौर दीपक सूळ, उपमहापौर चाँदपाशा घावटी, स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे, चंद्रकांत चिकटे, आयुक्त सुधाकर तेलंग, रवीशंकर जाधव, माजी आमदार वैजनाथ शिंदे, ललितभाई शहा आदी उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, आपण पर्यटन राज्यमंत्री असतानाच नाना-नानी पार्कच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून तलावाचे सुशोभीकरण, वॉकिंग ट्रॅकचे नूतनीकरण, मुलांसाठी अद्ययावत खेळणी, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सौरपथ दिवे, संरक्षण िभतीचे मजबुतीकरण, आदी कामे केली जाणार आहेत.

आगामी काळात लातूर शहरात वायफाय, चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे, वृक्षलागवड, नळांना मीटर बसवणे आदी योजना महापालिकेने राबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

धनेगाव धरणाबरोबरच पाण्याचे अन्य स्रोतही शहरासाठी उपलब्ध करून घेण्याचा महानगरपालिकेने अग्रक्रमाने विचार करावा. त्यायोगे शहरातील प्रत्येक विभागाला वेगवेगळय़ा स्रोतातून पाणीपुरवठा होऊ शकेल. आयुक्त सुधाकर तेलंग यांची पुण्याला बदली झाल्याबद्दल त्यांना याच कार्यक्रमात निरोपही देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:14 am

Web Title: ujjani dam water for latur
Next Stories
1 पक्ष बदनामी थांबविण्यासाठी राजीनामा दिला – खडसे
2 रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचे निधन
3 पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याचा गाळप परवाना रद्द
Just Now!
X