News Flash

आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

मनपाच्या तीन केंद्रांवर सुरुवात होणार

(संग्रहित छायाचित्र)

मनपाच्या तीन केंद्रांवर सुरुवात होणार

औरंगाबाद :  १८ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरणाचा  निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्र दिनी त्याची अंमलबजावणी केली जाणार असून शनिवारी तीन केंद्रावर व्यवस्था केली असून उद्या दुपारी २ वाजता लसीकरणाचा शुभारंभ होईल, असे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

तरुणांच्या लसीकरणासाठी  जिल्ह्यासाठी ७ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात मिनी घाटी आणि खुलताबाद येथे दोन ठिकाणी केंद्र असणार आहेत. तर, शहरातील बन्सीलालनगर आरोग्य केंद्र, सिडको एन-८ आणि एन-११ आरोग्य केंद्रात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे.  कोविन अ?ॅपवर शहरातील हजारो नागरिकांनी नोंदणी केली असून त्यातील  शंभर व्यक्तींना लस दिली जाईल, असे डॉ. पाडाळकर म्हणाले.

एक लसीकरण थांबले, एक सुरू

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लस पुरवठय़ामुळे थांबविण्यात आले आहे. मागणी केलेल्या सव्वा लाख लस येणे बाकी आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. मिळालेला लस साठा आता संपला आहे. लस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तरुणांच्या नव्या वयोगटातील १०० जणांना आमंत्रित केले जाणार असून  लस प्राप्त होताच लसीकरण केले जाईल. नागरिकांनी विनाकरण लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:01 am

Web Title: vaccination of citizens above 18 years of age from today zws 70
Next Stories
1 रेमडेसिविरचा तुटवडा कायम; घाटीमध्ये सलाईनची कमतरता
2 औरंगाबादमधील लस संपली; नव्याने सव्वा लाखांची मागणी
3 जानेफळ गावात शंभर टक्के लसीकरण
Just Now!
X