22 November 2019

News Flash

‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’

नांदेडमध्ये ईव्हीएम हटाओ, देश बचाओ राज्यस्तरीय घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र

वंचित आघाडीचा औरंगाबाद, नांदेडमध्ये घंटानाद

औरंगाबाद/नांदेड : वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, रिपब्लिकन सेना, लोकस्वराज्य आंदोलन, सुराज्य सेना, युवा पँथर व अन्य संघटनांच्या वतीने सोमवारी मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाओ, देश बचाओ हे राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

भारत हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली असून तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्वीकार केला. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका ह्य बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात व खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी देण्यात यावी, यासाठी नांदेडमध्ये ईव्हीएम हटाओ, देश बचाओ राज्यस्तरीय घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, रिपब्लिकन सेना, सुराज्य सेना, युवा पँथर, ओबीसी संघटना व अन्य संघटनांचे कार्यकत्रे, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

परभणी- भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीत सोमवारी ईव्हीएम हटाव, देश बचाव या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात घोषणा दिल्या. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण कनकुटे, आलमगीर खान आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

उस्मानाबाद-  उस्मानाबाद शहरासह परंडा येथेही आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे, विकास बनसोडे, स्वप्नील शिंगाडे, धनंजय शिंगाडे आदी उपस्थित होते. परंडय़ातील आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, जिल्हा सहसचिव धनंजय सोनटक्के, तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, शहराध्यक्ष दयानंद बनसोड यांच्यासह परंडा तालुक्यातील डोंजा, डोमगांव,  कुबेफळ, आवार पिंपरी, ढगिपपरी, कौडगांव, पिठापुरी, भोत्रा आदी गावातील कार्यकत्रे उपस्थित होते.

First Published on June 18, 2019 12:21 am

Web Title: vanchit aghadi protest against evm in aurangabad
Just Now!
X