29 November 2020

News Flash

औरंगाबादच्या जवानाला वीरमरण

बोचरे यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ातील देवगाव रंगारी येथील जवान हृषीकेश अशोक बोचरे (वय २७) यांना लेह-लडाख परिसरातील सीमा भागात लढताना मंगळवारी वीरमरण आले. त्यांचे पार्थिव गुरुवारी मूळ गावी आणले जाणार आहे.

बोचरे यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

२०१२ साली त्यांची सैन्यामध्ये निवड झाली होती. सध्या त्यांना लेह-लडाख परिसरातील तामसा या भागात सीमा रक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथेच त्यांना मंगळवारी दुपारच्या सुमारास वीरमरण आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 12:35 am

Web Title: veeramaran to the jawan of aurangabad abn 97
Next Stories
1 इथेनॉल तेजीत; साखर दुय्यम उत्पादन!
2 औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ६२७
3 औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या ५०८
Just Now!
X