औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विक्रम काळेंनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. भाजपच्या सतीश पत्की यांचा दारुण पराभव झाला. सतराव्या फेरीअखेर मतांचा कोटा पूर्ण झाला आणि विक्रम काळे यांना २५ हजार २८८ मते मिळाली. शिक्षक परिषदेचे भाजप पुरस्कृत उमेदवार सतीश पत्की यांना १३ हजार ७३५ मतांवर समाधान मानावे लागले. लक्षणीय मते मिळविणाऱ्यांमध्ये व्ही. जी. पवार यांचे नाव घ्यावे लागेल. शिक्षक संघटनेतील हा कार्यकर्ता तुलनेने मागे पडला आणि पुन्हा एकदा मराठवाडय़ात राष्ट्रवादीचा झेंडा उंच झाला. कसे घडले हे सारे याचे विश्लेषण करणारी भाजपमधील मंडळी आता थेट विनोद तावडे यांच्या कार्यशैलीपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह सर्व मंत्र्यांना मैदानात उतरवूनही या मतदारसंघावर विजय मिळविण्याचे स्वप्न भाजपला पूर्ण करता आले नाही.

या मतदारसंघात अनेक वेळा प्रयत्न करूनही यश पदरी पडत नाही, असे भाजपचे नेत्यांना माहीत होते. निवडणुकीचा हा इतिहास शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच सांगितला होता. शिक्षक परिषदेच्या सतीश पत्कींना पाठिंबा देताना भाजपची सगळी नेते मंडळी जाहीर सभेला उपस्थित  असली पाहिजे, असे फर्मान निघाले होते. मुद्दा मात्र शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीवर नेलेला मोर्चा आणि त्यात शिक्षकांनी वापरलेले अपशब्द याभोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे विरोधी उमेदवाराच्या विरोधात आरोपांची राळ उठवायची आणि प्रचाराच्या फुग्यात हवा भरत राहायची, अशी भाजपची निवडणूक प्रचार यंत्रणा या वेळीही कार्यरत झाली. मात्र फुगा किती मोठा करावा, याचे भान भाजपच्या नेत्यांना राहिले नाही. ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा मराठा मोर्चा, ओबीसी मोर्चे, मुस्लीम मोर्चाना सुरुवात झाली होती. जातीय ध्रुवीकरणाचे टोकदार दर्शन घडत होते. उमेदवारांच्या कामांऐवजी त्यांच्या जातीचा विचार व्हावा, असे वातावरण संपूर्ण मराठवाडाभर होते. त्याचा फटका भाजपचे उमेदवार सतीश पत्की यांना बसणार अशी चर्चा खुलेआम सुरू होती. केवळ एवढे एकच कारण. मात्र या निवडणुकीतील मतदानाला नव्हते. मराठवाडय़ातील बहुतांश खासगी शाळा, महाविद्यालयांवर तसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व. एकटय़ा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मतदारांचा विचार केला तरी भाजप या मतदारसंघात कसा अशक्त हे सांगावे लागत नसे. या शिक्षण संस्थेचा कारभार राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हाती आहे. त्यांच्या शब्दालाही शिक्षकांमध्ये किंमत आहे. विक्रम काळे यांच्या हॅट्ट्रिकसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. खरे तर तीन वेळा काळे निवडून आले तर ते सीनिअर ठरतील. त्यामुळे ते काही उमेदवारासाठी फारसे प्रयत्न करणार नाहीत, अशा गप्पा भाजपचे कार्यकर्ते मारायचे. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीमधील नेत्यांनी एकी दाखवली. त्याला आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही साथ दिली. परिणामी काळेंचा ‘विक्रम’ झाला. सलग तीन वेळा या मतदारसंघावर त्यांनी विजयाचा झेंडा फडकला. केवळ जातीच्या आधारे मतदान झाले असाही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जाणारा दावा तसा फोलच म्हणता येईल. कारण या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडनेही सहभाग घेतला होता. पण त्यांना मिळालेला प्रतिसाद नगण्य म्हणावा एवढाच आहे. शिक्षकांनी जिंकणारा उमेदवार कोण याची चाचपणी करत मतदान केले. उस्मानाबाद, लातूर या दोन जिल्हय़ांत विक्रम काळे यांना मानणारे अनेक शिक्षक मतदार आहेत. तसेच व्ही. जी. पवार यांचीही ताकद आहे. मात्र पवार यांना ७ हजार ४८९ मते मिळाली.

21 candidates in the battle of Buldhana Lok Sabha Constituency additional ballot unit will have to be added
उमेदवारांची भाऊगर्दी, अतिरिक्त बॅलेट युनिट जोडावे लागेल… वाचा कुठे घडला हा प्रकार?
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
ips officer abdur rahman marathi news, ips officer abdur rahman dhule lok sabha marathi news
धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार
Congress state vice president Kishore Gajbhiye filed an independent nomination form in Ramtek Lok Sabha constituency
रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी; गजभियेंचा वंचित कडून अर्ज

काळेंचा प्रचार परिणामकारक

शिक्षकांना भाजप न्याय देणार नाही, अशी वातावरणनिर्मिती करण्यातही काळे यांना यश आले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एकही सभा घेतली नाही, याकडे आता लक्ष वेधले जात आहे. प्रचाराची हवा करायची आणि सत्तेमध्ये असल्याने कामे अधिक सोयीचे होतील, असे सांगणाऱ्या भाजपला शिक्षकांनी नाकारले, असेच या निवडणुकीचे वर्णन केले जात आहे. ५८ हजार मतांच्या या विधान परिषदेच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचा हा विजय भविष्यातही त्यांना उपयोगी पडणारा आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद असले तरी ते ऐन निवडणुकीमध्ये एकमेकांना साथ देतात, हा संदेशही अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. मोठय़ा नेत्यांनी जाहीर प्रचारात लक्ष घालत भाजपचे मराठवाडय़ातील सर्व नेते सतीश पत्की निवडून यावेत, यासाठी प्रयत्नशील होते. यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर यांनी सभा घेतल्या. पण शिक्षकांनी भाजपला नाकारले. उमेदवाराची सर्व जिल्हय़ात ओळख नसणे हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे भाजपमधून सांगितले जात आहे.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]