दुष्काळाच्या झळा दिवसेंस दिवस वाढत असून डिसेंबर महिन्यातच जिल्ह्यातील टँकरची संख्या जवळपास ५१३ पर्यंत पोहचली आहे. यात ३९३ गाव ३२ वाड्यांतील ७ लाख ८४ हजार नागरिक टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यात सर्वात १०४ टँकर हे एकट्या गंगापूर तालुक्यात सुरू आहे.

यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानाने संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांसह जलस्तर खालवलयामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरिप हंगामासह आता रब्बि हंगाम ही शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. आता जवळ असलेली जणावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यासमोर मोठे अव्हान आहे. जिल्ह्यात ३९३ गाव व ३२ वाड्यातील ७ लाख ८४ हजार ६१८ नागरिकांना ५१३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असून यात १ हजार ६४ टँकरच्या खेपा मंजूर करण्यात आल्या आहे. यासाठी २६५ विहीरी शासनाने अधिग्रहण केले आहे.

दुष्काळाच्या सर्वात जास्त झळा गंगापूर तालुक्याला बसत असून येथील १ लाख ७७ हजार २१० नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी १०४ टँकर सुरू आहे, पैठण १ लाख ५० हजार नागरिकांना ७४ टँकर, वैजापूर १ लाख ३ हजार नागरिकांना ७४ टँकर, औरंगाबाद ४६, सिल्लोड ४६, कन्नड २०, पुâलंब्री १९, खुलताबाद १० टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात केवळ सोयगांव तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.