उदगीर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपरिषदेने नवीन २१ िवधनविहिरी घेतल्या असून िवधनविहिरींना कमी-अधिक प्रमाणात पाणीही लागले. परंतु टंचाईनिधीची वाट पाहत बसलेल्या पालिकेला त्यात पंप टाकून पाणी उपसण्यास विलंब होत आहे. परिणामी नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.
सध्या ७ िवधनविहिरींना पंप बसवले आहेत. आणखी ५ पंप बसवण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या उपाययोजनेच्या प्रस्तावास लवकरच तांत्रिक मंजुरी मिळेल, असे न. प. मुख्याधिकारी दिलीप देशमुख म्हणाले. शिवाय जिल्हा प्रशासनाकडूनही उदगीरच्या टंचाईकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आतापर्यंत उदगीरच्या प्रस्तावाचे पसे मिळाले नाहीत.
उदगीर शहर भीषण पाणीटंचाईने त्रस्त असताना दोन महिन्यांआड अपुरा व त्यातून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषदेकडे मालकीचे तीन टँकर आहेत. परंतु त्यातील एक बंद आहे तर दोन सुरू आहेत. शिवाय पाच खासगी टँकर पाणीपुरवठय़ासाठी लावण्यात आले आहेत. देवर्जन प्रकल्पातील पाण्याची स्थिती लक्षात घेता हा पाणीपुरवठा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या शहरात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातूनही तहान भागत नाही.
दरम्यान, भूजल सर्वेक्षण विभागाच्या निर्देशानुसार पालिकेने शहर परिसरात जवळपास २१ िवधनविहिरी घेतल्या आहेत. महिना उलटून गेला तरीही त्यात पंप सोडण्यास विलंब केला जात आहे. उदगीर नगरपरिषद सरकारकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. परंतु अजूनही त्यांच्या पदरी काही पडले नाही. मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे झालेल्या टंचाई बठकीत १२ कोटी रुपयांची घोषणा करून महिना लोटत आला, तरीही उदगीरकरांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे उदगीरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.