News Flash

दिल्लीत आम्हाला पवार साहेबांचा मोठा आधार होता : चंद्रकांत खैरे

दिल्लीमध्ये काम करत असताना कोणती अडचण आली नाही. कोणतेही काम असले की पवार साहेब आपुलकीने विचारपूस करायचे. दिल्लीमध्ये आम्हाला शरद पवार यांचा मोठा आधार होता,

औरंगाबाद : शरद पवार यांचा येथे सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.

दिल्लीमध्ये काम करत असताना कोणती अडचण आली नाही. कोणतेही काम असले की पवार साहेब आपुलकीने विचारपूस करायचे. दिल्लीमध्ये आम्हाला शरद पवार यांचा मोठा आधार होता, अशी कृतज्ञ भावना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी येथे व्यक्त केली. ते शरद पवार यांच्या राजकारणातील ५० वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त सर्वपक्षीय नागरी सत्कार  करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

खैरे म्हणाले, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहीली नाही. आता कोणीही काम घेऊन आला की त्याला आपल्या पक्षात ओढायची पद्धत सुरु झाली आहे. हे शरद पवार यांनी कधी केले नाही. असा टोला खैरे यांनी भाजपला उद्देशून लगावला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, रावसाहेब दानवे आणि आमदार पंकजा मुंडे तसेच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.

कार्यक्रम सुरु होण्याअगोदर शरद पवार यांच्या पंचहत्तरी निमित्त दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषणही दाखवण्यात आले. त्या अगोदर शरद पवार यांच्या जीवनावर आधारित माहितीपटही दाखवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 6:35 pm

Web Title: we had a big support of sharad pawar in delhi says chandrakant khaire
Next Stories
1 अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबवा; महापालिकेत नगसेवकांची मागणी
2 मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान ! औरंगाबादमध्ये महिलेला चोरट्यांनी लुटले
3 सोयाबीनच्या दरासाठी राज्य शासन आग्रही
Just Now!
X