News Flash

मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान ! औरंगाबादमध्ये महिलेला चोरट्यांनी लुटले

परिसरातील इतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला चोरट्यांनी लुटल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास वेदांतनगर येथील पगारीया रेसिडेन्सी जवळ ही घटना घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुजाता पगारीया (वय ५३) असे मंगळसूत्र हिसकावलेल्या महिलेचे नाव आहे. आपल्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सुजाता या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना घरी परतताना हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ५३ वर्षीय सुजाता यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून घेतले आणि पोबारा केला.
सकाळी मॉर्निंग वॉकला येथे अनेक महिला जातात. मात्र, आता या घटनेमुळे परिसरातील मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 2:35 pm

Web Title: women looted while morning walk at aurangabad
Next Stories
1 सोयाबीनच्या दरासाठी राज्य शासन आग्रही
2 नितीशकुमारांनी लोकमताचा अनादर केला – स्वामी अग्निवेश
3 औरंगाबादमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर अखेर हातोडा, पंधरा ठिकाणी कारवाई
Just Now!
X