News Flash

औरंगाबादमधील कटकटगेट भागात तरुणाची आत्महत्या

घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही

शेख इलियास शेख अन्वर उर्फ पप्पू

औरंगाबाद शहरातील कटकटगेट भागात एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेख इलियास शेख अन्वर उर्फ पप्पू (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो ट्रक मेकॅनिक म्हणून काम करत होता. शनिवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र, या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नेहमीप्रमाणे आज सकाळी तो झोपेतून उठला नाही म्हणून नातेवाईकांनी त्याचा खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र त्यांनी आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी दरवाजा लोटून आत डोकावून पाहिले तर इलियासने छताला गळफास घेतल्याचे दिसून आले.

नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच जिंसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात हालवण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीच्या शवविच्छेदन विभागात नेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2017 3:29 pm

Web Title: youth commits suicide in katakgate area in aurangabad
Next Stories
1 ‘मानव विकास’मधून मराठवाडय़ात रोजगारवाढीचा प्रयत्न
2 आवळला जाणारा फास सोडवताना..
3 सोयाबीननंतर तूर, हरभऱ्याची विक्रीही हमीभावापेक्षा कमी भावाने 
Just Now!
X