औरंगाबाद शहरातील सिडको एन-७ परिसरातील अयोध्या नगरीतील २७ वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शाहू राजा सुभाष असं मृत तरुणाचं नाव असून त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. तो इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शहरातील सिडको परिसरातील अयोध्यानगरी भागात मागील दहा महिन्यांपासून तो रमेश नावाच्या त्याच्या मित्रासोबत राहत होता. शुक्रवारी सकाळी जेव्हा रमेश झोपेतून उठला तेव्हा त्याला शाहूने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना व पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तात्काळ शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तो ज्या खोलीत राहत होता ती खोली पोलिसांनी सील केली असून पुढील तपास सुरु आहे.

Sandeep Sankpal came on bicycle and submitted his candidature to Kolhapur to protect the environment
कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल