छत्रपती संभाजीनगर : राज्यातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अधिकारी संघटनेसह तीन संघटनांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. पदोन्नतीसाठी महाराष्ट्र महसूल सेवेस केंद्र सरकारने राज्य नागरी सेवा म्हणून मान्यता असणे अनिवार्य आहे. मात्र, तशी कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. केवळ आठ वर्षांची उपजिल्हाधिकारी म्हणून केलेली सेवा पदोन्नतीसाठी पुरेशी नाही, असा आक्षेप नोंदवत बढतीचा प्रस्ताव थांबवावा, अशी विनंती तीन संघटनांच्या अध्यक्ष, सचिवांनी केली आहे.

हेही वाचा >>> Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींचा घास भावांनी हिसकावला; १२ पुरुषांनी महिलांचे फोटो लावून भरला अर्ज, चौकशी सुरू

accident in chhatrapati sambhaji nagar
छ. संभाजी नगरमधील भीषण अपघात; दीड महिन्याच्या बाळासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारसं करून पुण्याला जाताना घडला अपघात
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Majhi Ladki Bahin Yojana Fraud
Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींचा घास भावांनी हिसकावला; १२ पुरुषांनी महिलांचे फोटो लावून भरला अर्ज, चौकशी सुरू
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

१ जानेवारी २०२३ रोजीच्या रिक्त जागांवर उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती देण्याचा प्रस्ताव नुकताच तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव तयार करताना केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या आदेशानुसार केवळ आठ वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणे एवढा एकच निकष पदोन्नतीसाठी पुरेसा नाही, तर केंद्र शासनाने राज्य नागरी सेवेस मान्यता देणे आवश्यक आहे.

अशी मान्यता दिल्याबाबतची कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रियदर्शनी मोरे या महिला अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात कागदपत्रे मागवली होती.,पण मान्यतेबाबतची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविण्यात आले.