scorecardresearch

औरंगाबाद: हवामान बदलामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात ३० टक्क्यांची घट

अतिवृष्टीनंतर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने ऊसवाढ पुरेशी न झाल्याने हेक्टरी उसाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले आहे.

औरंगाबाद: हवामान बदलामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात ३० टक्क्यांची घट
हवामान बदलामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात ३० टक्क्यांची घट

सीमालगतच्या लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांना कर्नाटकातून ऊस

अतिवृष्टीनंतर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने ऊसवाढ पुरेशी न झाल्याने हेक्टरी उसाचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या तिन्ही सीमांलगतच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्नाटकातून ऊस आणावा लागत आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेपर्यंत ऊस गाळप हंगाम संपेल असे चित्र सध्या दिसून येत आहे. या मुळे देशाच्या व राज्याच्या साखर उत्पादनात मात्र फारसा परिणाम दिसून येणार नाही.

गेल्या हंगामात सरासरी हेक्टरी १०० टनापर्यंत असणारे ऊस उत्पादन आता ८० टनापर्यंत घसरले असल्याचा दावा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला. देशात या वर्षी ३५७ ते ३६० लाख िक्वटल साखर उत्पादन होऊ शकेल असा अंदाज होता. तर राज्यात १०५ ते ११० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी १३० लाख िक्वटल साखर उत्पादन झाले होते. या वर्षी उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले,की अतिवृष्टी तर झालीच पण अनेक दिवस सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे ऊसवाढीला पोषक असे वातावरण नव्हते. परिणामी उसाचे हेक्टरी उत्पादन घटले आहे. जसजसा जुना ऊस येईल तसतसे उत्पादन घटेल व सध्या घसरलेले हे २० टक्क्याचे प्रमाण अधिक वाढत जाईल. हंगाम संपताना ही घट ३० टक्के असू शकेल. त्यामुळे सीमालगतच्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांना कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, आळंद, बसवकल्याण या भागातून ऊस आणावा लागत आहे.

सरासरी ऊस उत्पादनात घट दिसून येत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात कर्नाटकातून ऊस आणला जात आहे. या वर्षी ऊस उत्पादन घटले असले तरी साखर वा इथेनॉल उत्पादनामध्ये फारसा परिणाम होणार नाही.-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर महाराष्ट्र

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 00:48 IST

संबंधित बातम्या