औरंगाबाद शहरातील कुरिअर कंपनीतून पोलिसांनी ३७ तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची मागणी करणाऱ्यांची पोलीस स्वतंत्र चौकशी करणार असून या पूर्वीही औरंगाबाद पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर ऑनलाइन हत्यार विकणाऱ्या कंपन्यावर कारवाई करता येईल काय, याची चाचपणी केली होती. मात्र, यात त्यांना यश मिळाले नाही. आता पुन्हा डिटीडीसी खासगी टपाल वाहतूक कंपनीतून ३७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमृतसर व जालंधर येथून आलेल्या तलवारी नक्की कोणत्या कारणासाठी मागविल्या होत्या याची चौकशी केली जात आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक कापण्यासाठीही तलवारींचा उपयोग फॅशन म्हणून केला जात आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी छापा टाकून ही करवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त उज्वला वनकर यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस प्रयत्न करत असले तरी कुरिअर कंपनीकडून शहरात तलवारी येत असल्याचे दिसून आल्याने या प्रकरणाचा अधिक तपास करणे पोलिसांना आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास खटके यांनी ही कारवाई केली. पोलीस उपायुक्त उज्वला वनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीटीडीसी या कुरियर मार्फत ३७ तलवारी मागविण्यात आल्या असून यामागे कोण आहे, याचा शोध आम्ही घेणार आहोत. तसेच यापूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्या प्रकरणातील लोकांचा यात सहभाग आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे.