छत्रपती संभाजीनगर – महाड – चवदार तळे येथे २९ मे रोजी सार्वजनिक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना केल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य एकाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भाने भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बाबूराव ऐडके (रा. सिडको – एन-५) यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार आमदार आव्हाडांची वरील विषयानुषंगे केलेली कृती ही माथी भडकावण्यासह जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली आहे. त्यामुळे आपल्या व इतर दहा जणांसह समाजाच्याही भावना दुखावल्याने आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे रवींद्र ऐडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against mla jitendra awhad and both amy