scorecardresearch

पैठणमध्ये तोतया सीबीआय अधिकार्‍यांची टोळी पकडली

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर ५० लाखांची मागणी..

man arrested
( संग्रहित छायचित्र )

औरंगाबाद – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर ५० लाखांची मागणी एका सराफा व्यावसायिकाकडे मागणाऱ्या तोतया टोळीला पैठण पोलिसांनी रविवारी पकडले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. सराफा व्यावसायिक प्रसाद लोळगे यांना संशय येताच त्यांनी माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांना फोन केला. लोळगे यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी या तोतया अधिकारीची चौकशी केली असता त्याचे नाव विठ्ठल हाडगुळे असल्याचे त्याने सांगितले. अधिक चौकशीतून इतर काही नावे समोर आली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A gang of fake cbi officers was caught in paithan amy