A private bus caught fire in Aurangabad ssb 93 | Loksatta

औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आग

सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर नाक्यावरील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

private bus caught fire Aurangabad
प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने पेट घेतला (image – लोकसत्ता टीम)

प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर नाक्यावरील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

हेही वाचा – बनावट दरपत्रकांच्या आधारे कर्ज योजनांची लूट; बँकांना कोटय़वधीचा गंडा

हेही वाचा – ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हिमालया ट्रॅव्हल कंपनीची ही बस पंढरपूरच्या दिशेने इंधन भरण्यासाठी नेण्यात येत होती. बसमध्ये चालक व एक त्याचा सहकारी होता. केंद्रीय विद्यालयासमोर बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी खाली उड्या घेतल्या व अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने 2 बंबातून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, डी. डी. साळुंके, एल. पी. कोल्हे आदींसह सहकार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 11:35 IST
Next Story
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…