बनावट मसाल्याचा एक टन साठा जप्त

प्रवीण अंबारी या मसाल्याचे बनावट उत्पादन तयार करून शहरासह इतरत्र त्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली

प्रवीण अंबारी या मसाल्याचे बनावट उत्पादन तयार करून शहरासह इतरत्र त्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करून ३ लाख ६६ हजार ७८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॉपीराईट कायद्यानुसार सुनील एकनाथ कोरडे (एन ९, शिवाजीनगर, औरंगाबाद) याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.प्रवीण अंबारी मसाल्याचे बनावट उत्पादन तयार करून शहरासह परिसरात त्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून या मसाल्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे विक्री व्यवस्थापक राहुल नागपाल व कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.या मसाल्याचे बनावट उत्पादन तयार करून पॅकिंग केले जात होते, त्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागपाल यांना बरोबर घेऊन छापा टाकला.
या वेळी या मसाल्याचे एक टन बनावट उत्पादन प्रत्येकी ३० व ५० ग्रॅम पुडय़ांमध्ये पॅक, तसेच काही प्रमाणात सुटय़ा स्वरुपात मिळून आले. बनावट मसाला पॅकिंगचे साहित्य, तसेच मसाले पॅकिंग करण्यास वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री असा एकूण ३ लाख ६६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A ton of fake spice seized

ताज्या बातम्या