छत्रपती संभाजीनगर : ‘मला भाजपची ऑफर आली होती. तुम्ही या, नाही तर ठाेकून काढू, ’असेही जंतरमंतर आंदोलना दरम्यान म्हटले होते. केवळ एवढेच नाही तर आई – बाबांना पाहून घेऊ अशी धमकी दिल्याचा दावा विद्यार्थी आंदोलक नेता अभिजित दिपके यांनी केला आहे. त्यांनी कितीही ऑफर दिल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही, असे स्पष्टीकरणही दिपके यांनी दिले.

पुढे बोलताना दिपके म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलास धमक्या देत आहात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा मी आहे. ३० वर्षाच्या मुलास तुम्ही किती धमक्या देणार आहेत.’ ‘जेन झी’ संस्कृती बिघडवत असल्याच्या बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचाही दिपके यांनी समाचार घेतला. आमच्या हक्काच्या मागण्यासाठी लढणे बननामी आहे. आणि असे असेल तर ते आम्ही बघून घेऊ. रामदेवबाबांनी आपल्या प्रोडक्ट विकण्याकडे लक्ष द्यावे.

…तर अमित शहांचे अपयश

जर आम्हाला बाहेरुन पैसे येतो असे म्हणत असाल तर गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेशही अमित शहा यांनीच दिले होते. जर क्रॉकोच जनता पार्टीला परेदशातून पैसा येत असेल तर हे तर गृहमंत्र्याचेच अपयश असेल. मग ते कसले चाणक्य, असेही अभिजित म्हणाले.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना काढून नेमण्यात आलेले नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बिल्किस बानू प्रकरणात बलत्काऱ्यांच्या बाजूने मत व्यक्त केले होते. याचा अर्थ प्रधान यांना काढून एक विचित्र माणूस भरला आहे. कारण या पक्षातून हे असेच होणार कारण त्यात सारे गुंडच भरले आहेत. जेन झी आहेत कोण ? १५ ते २५ मधील तरुण वेगळे आहेत का , तेच तर पुढे देश चालवणार आहे. त्यांना ट्रोल करुन काय उपयोग काय, असेही अभिजित दिपके म्हणाला. आंदोलनात जेनझी मोबाईल रेकॉर्ड करत आहेत. पण पोलिसांना रेकॉर्ड होण्याची भीती का वाटते आहे. पोलिसांनी संविधानच्या मार्गावर जावे. असे होत नसेल तर पोलिसांनी खाकी चड्डी घालावी आणि नागपूरला जावे. विरोधक एकत्र आले तर मदत कराल का या प्रश्नावर सीबायआय, ईडीच्या जोरावर शिवसेना, आणि राष्ट्रवादी फोडली. या देशातील चारही स्तंभ सध्या धोक्यात आहेत, असेही दिपके म्हणाले.