छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दीड महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि सात वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळूजपासून तीन किलोमीटर पुढे लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून हे कुटुंब पुण्याला जात होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अजय देसरकर हे अभियंते अमरावतीहून कुटुंबासह त्यांच्या रेनो क्वीड गाडीने पुण्याला जात होते. यावेळी वाळूजकडून तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी थेट दुभाजकांना ओलांडून देसरकर यांच्या कारला जाऊन धडकली. या अपघातात देसरकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

Preeti Makhija Death in Accident
Preeti Makhija : केशर पान मसाला कंपनी मालकाच्या पत्नीचा अपघातात मृत्यू, आग्रा एक्स्प्रेस वे वरची घटना
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
नियम डावलून २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती? प्रस्तावाविरोधात तीन संघटनांची मुख्य सचिवांकडे तक्रार
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही गाडी वाळूज येथील एका १९ वर्षीय तरुणांची असून त्याने ही गाडी त्याच्या मित्राला चालवायला दिली होती. यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे हा अपघात घडल्याची माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली आहे. तसेच त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचही त्यांनी सांगितले.