छत्रपती संभाजीनगर – ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे बुधवारी १२ च्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाले आहेत. ॲड. आंबेडकर हे परभणी येथील मृत तरुण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात बाजू मांडणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर मागील काही महिन्यांपासून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात बाजू मांडत असून डिसेंबर २०२४ मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोठडीत मृत्यू झाला होता.
या प्रकरणांमध्ये कोठडीतील मृत्यू प्रकरणांमध्ये दिशादर्शक व मार्गदर्शक तत्त्वांबाबत स्पष्टता नसून काही निर्णय व मार्गदर्शक तत्त्वांबाबत स्पष्टता यावी तसेच या प्रकरणांमध्ये वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मांडली आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासह काही निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

