एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली. “संजय शिरसाटांचा दुसरा संजय राऊत झाला आहे. ते आज माझा नंबर लागेल असं समजून दररोज उठून बोलत असतात,” अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

इम्तियाज जलील म्हणाले, “सरकारने इम्तियाज जलील काय सांगतात ते ऐकलं नाही, तरी किमान संजय शिरसाट जे सांगतात ते ऐकावं. ते अनेक महिन्यांपासून मला मंत्रीपद द्या असं ओरडत आहेत. आता त्यांनी मंत्रीपदासाठी काय करावं? किरकोळ लोकांना मंत्रीपद दिलं. हा माणूस दररोज टीव्हीवर येऊन शिवसेनेच्या दुसऱ्या संजय राऊतांप्रमाणे बोलतो. संजय शिरसाटांचा दुसरा संजय राऊत झाला आहे. ते आज माझा नंबर लागेल असं समजून दररोज उठून बोलत असतात.”

amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

“एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना लवकर मंत्री करावं”

“ते इतके वैतागले आहेत की, ते काय बोलत आहेत हे त्यांनाही कळत नाही. शिरसाट यांनी त्यांचा राग आमच्यावर काढू नये. इम्तियाज जलीलचं ऐकू नका, पण सरकारला सांगा किमान तुमचं तरी ऐका. माझी खूप इच्छा आहे की, माझ्या शहराला तीन नाही, तर आणखी एक चौथं मंत्रीपद हवं आहे. एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना लवकर मंत्री करावं. शिरसाट शिंदेंसाठी भांडण करतात. त्यांना एक मंत्रीपद द्या,” अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

हेही वाचा : संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर प्रतिक्रिया, म्हणाले, “मला वाटतं की…”

“ठाकरे गटाचे स्थानिक नेते गोधडीत झोपलेले होते”

“उद्धव ठाकरेंनी माझ्यावर टीका केली नाही याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या स्थानिक सर्व नेते माझ्या नावाने बोंबाबोंब करत आहेत. मी मंदिर वाचवायला कशाला गेलो असं विचारत आहेत. ते स्वतः गोधडीत झोपलेले होते. दंगल झाली तेव्हा त्यांनी मंदिर वाचवण्यासाठी यायचं होतं. मात्र, ते घरी बसले होते. सकाळी ब्रश करून, चहा घेऊन आले. त्यामुळे मला वाटत होतं की, सभेत माझ्यावर बोलतील. मात्र, त्यांनी माझ्यावर टीका केली नाही त्यासाठी त्यांचे धन्यवाद,” असंही जलील यांनी नमूद केलं.