भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपाने विजय संकल्प सभांना सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज(सोमवार) औरंगाबादेत नड्डा यांची सभा झाली. मात्र या सभेत अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या, तसेच नड्डा यांनी भाषणात शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीटद्वारे प्रत्युत्तर दिले.

अंबादास दानवे यांनी जेपी नड्डा यांच्याकडून भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जागी बाळासाहेब देवरस असा उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा उचलला असून, त्यावरून भाजपाला टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

हेही वाचा – “जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका? तत्काळ माफी मागा नाहीतर…” चित्रा वाघ यांचं विधान!

नड्डाजी, “यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार! ” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

याशिवाय सभा ठिकाणच्या रिकाम्या खुर्च्यावरून बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पाहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. ” असं दानवे म्हणाले आहेत.

जेपी नड्डा नेमकं काय म्हणाले? –

“निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जेव्हा आलो होतो, तेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की वर नरेंद्र खाली देवेंद्र आणि यानुसारच आम्ही पुढे निघालो होतो. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका देऊन खुर्चीच्या लालसेपोटी त्यांच्याशी हातमिळवणी केली, ज्यांच्याविरोधात बाळासाहेब देवरस संपूर्ण आयुष्य लढत राहिले. त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाऊन ते मिळाले.” असं नड्डा यांनी भाषणात म्हटलं आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरें यांचं नाव घेण्याऐवजी त्यांनी बाळासाहेब देवरस यांचं नाव घेतल्याचं दिसून येतं.