scorecardresearch

राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड, १५ वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक वॉरंट रद्द!

परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड, १५ वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक वॉरंट रद्द!
राज ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयाने त्यांचाविरोधातील अटक वॉरंट रद्द केला असून त्यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस असं काही करतील असं वाटत नाही, ते बदला…”, तैलचित्राच्या निमंत्रणावरून संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, “महाराष्ट्रात…”

यांसदर्भात बोलताना राज ठाकरेंचे वकील म्हणाले, ”वैद्यकीय कारणांमुळेच राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही, हे आम्ही आज न्यायायलापुढे मांडले. न्यालयाने हे मान्य केलं असून अटक त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द केला आहे. तसेच याप्रकरणी २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.”

हेही वाचा – परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचानं केलं राज ठाकरेंचं स्वागत; ५० फूट फुलांच्या हाराची जोरदार चर्चा!

नेमकं काय आहे प्रकरण?

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या